करमाळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ‘लाडकी बहिण योजने’च्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10 वा अर्थसंकल्प मांडताना महिलांसाठी खास लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार अशीही घोषणा केली आणि आतापर्यंत 80% महिलांच्या खात्यावर पैसे देखील जमा झाले. परंतु विरोधकांकडून वारंवार हि योजना बंद होणार असे सांगून महिलांची दिशाभूल करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हि लाडकी बहीण योजना येणाऱ्या काळात पुढील अनेक वर्ष कायम चालू राहावी याच्या समर्थनार्थ करमाळा विधानसभा मतदारसंघातील करमाळा शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

करमाळा येथे महिलांनी अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला. हा उपक्रम करमाळा विधानसभेचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी फुलसौंदर चौक करमाळा येथे आयोजित केला होता. या मोहिमेत स्थानिक महिलांनी व नागरिकांनी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात सहभागी होत स्वाक्षरी करत ही योजना यापुढेही अविरतपणे सुरु राहण्यासाठी पाठिंबा दर्शविला. यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, जेष्ठ नेते विवेक येवले, महिला जिल्हा उपाध्यक्ष नंदिनी लुंगारे, युवक जिल्हा खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी, मकसूद बागवान यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







