राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत मच्छिंद्र लोंढे याला रौप्य पदक
करमाळा (दि.१) – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा मधील मच्छिंद्र नाथा लोंढे याने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा १४,१७,१९ वर्ष वयोगट मुले व मुली या भिमानगर एज्युकेशन सोसायटी शाळा,भीमा नगर कॉलनी, (पश्चिम) मुंबई येथे दिनांक २८ ते २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेतून १९ वर्षाखालील मुलांच्या गटात मच्छिंद्र लोंढे यांने पुणे विभागातर्फे रौप्य पदक प्राप्त करून मल्लखांब मध्ये घवघवित यश संपादन केले. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून एकूण ११ विभागामधून ३२४ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मच्छिंद्र लोंढेला ३०. ०० गुणापैकी २३.९५ गुणांक प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये १९ वर्षे वयोगटातून पुणे विभागातून मच्छिंद्रनाथा लोंढे याने दैदीप्यमान कामगिरी करून पुणे विभागाला रौप्य पदक प्राप्त करून दिले.
या यशस्वी खेळाडूला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. राम काळे व त्रिमूर्ती क्लबचे सागर शिरसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मच्छिंद्र लोंढे हा त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा येथे सराव करीत आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड,संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.