‘गोल्डन रफी’ कार्यक्रमात गायक प्रवीण अवचर यांचे होणार सादरीकरण

करमाळा (दि.११) : दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पुणे येथे शनिवारी 18 जानेवारी रोजी गोल्डन रफी या या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये गायची संधी करमाळा तालुक्यातील सुपुत्र गायक प्रवीणकुमार अवचर यांना मिळाली आहे.
हा कार्यक्रम 18 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे स्व मोहम्मद रफी यांचे सुपुत्र शाहिद रफी यांनी आयोजित केला आहे. श्री. अवचर यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमात गायची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
अवचर यांच्या सोबत पुणे येथील प्रसिद्ध गायक अली हुसेन, गफार मोमीन, आनंद म्हसवडे, गायिका अर्चना पोतनीस, मोनाली दुबे यांचे आवाजात मोहम्मद रफी साहेब यांची गाजलेली चित्रपट गीते सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचे म्युझिक अरेंजिंग पुणे येथील प्रसिद्ध संगीतकार चिंतन मोढा हे करणार आहेत. पुण्यासह राज्यातील रसिक श्रोत्या साठी अत्यंत श्रवणीय मैफिल असून जास्तीत जास्त संख्येने श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अनिल चौहान यांनी केलेले आहे .




