राष्ट्रीय शुटींग स्पर्धेत चिखलठाण येथील बहिण-भावांनी मिळवले सुवर्णपदक
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : शालेय राष्ट्रीय शुटींग स्पर्धेत चिखलठाण येथील निकिता अमोल रोकडे व श्रेयस अमोल रोकडे या बहिण-भावांनी आपला दबदबा कायम करत सुवर्णपदक पटकावले आहे.
सध्या हे बहिणभाऊ त्रिमुर्ती शैक्षणिक संकुल, नेवासा या शाळेमध्ये शिकत आहेत. निकिता व श्रेयस यांनी या स्पर्धेत यश मिळवून चिखलठाण गावाचे नांव राष्ट्रीय पातळीवर नेल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी चिखलठाण येथे दोघांचे जंगी सत्काराचे आयोजन केले होते.
याप्रसंगी आदिनाथचे माजी संचालक संदिपान बारकुंड, सरपंच धनश्री गलांडे, उपसरपंच आबासाहेब मारकड, मुख्याध्यापक वायदंडे, गोटू पवार, ग्रा.पं. सदस्य आनंद पोळ, सौ. चव्हाण, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत सुरवसे, साहेबराव मारकड, मारूती गायकवाड, पोलीस पाटील दिलीप फुके, बाळासाहेब गव्हाणे, सर्जेराव मारकड, सतीश बनसुडे, पप्पू गव्हाणे, संतोष सरडे, सतीश बनसुडे, पप्पू गव्हाणे, संतोष सरडे, अमोल रोकडे, रंगनाथ रोकडे, सुदाम चव्हाण, किसन पवार, विवेक जानभरे, सतीश तरंगे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी राजेंद्र बारकुंड यांनी रोकडे बहिण-भावास आमदार संजयमामा शिंदे यांचे वतीने आशियाई, ऑलंपीक स्पर्धेस जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.