शाळेचे कुलूप तोडून स्मार्ट टीव्ही व कपाटातील पैशांची चोरी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील केम येथील इंग्लिश मेडियम स्कूल येथे मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या ऑफीसचे कुलूप तोडून २२ हजार रुपये किंमतीचा स्मार्ट टीव्ही व कपाटातील तीन हजार रुपये रोख रक्कम लंपास केली असल्याची घटना घडली आहे. याबाबत मुख्याध्यापक सुहास काळे यांनी माहिती दिली.
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुख्याध्यापक सुहास काळे शाळेत गेल्यावर कुलूप तुटलेले दिसले व ऑफिस मधील टिव्ही व कपाटातील तीन हजार रुपये रोख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेमुळे केम येथील नागरिकांतून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गावातील केम पोलिस मित्र ग्रुप ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी रात्री गावातून गस्त घालत आहेत तरी पण चोऱ्या होत आहेत. पोलीसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


