सामाजिक कार्यकर्ते खाटेर यांना ‘श्री कमलाईदेवी गौरव’ पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.१२) – करमाळा येथे श्री कमलादेवी माता नवरात्र उत्सवानिमित्त करमाळा फेस्टिवल चे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात श्री जगदंबा देवी बहूउद्देशीय संस्था व महप्रसाद वाटप मंडळ, अन्न छत्र मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘श्री कमलाईदेवी गौरव पुरस्कार’ करमाळा येथील तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांना देण्यात आला.

श्रेणिकशेठ खाटेर यांनी आजवर केलेले विविध सामाजिक कार्य, सांस्कृतिक महोत्सव आयोजन, तीर्थक्षेत्र यात्रेचे आयोजन, समाजाबद्दल असलेली आस्था, गो शाळेचे संगोपन, नेत्ररोग शिबीर आयोजन, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळे,इ. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक व सांस्कृतिक संस्थाना मदत, गोरगरिबांना मदत ई. या सर्व कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे अध्यक्ष नवनाथ सोरटे यांनी सांगितले.

यावेळेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे यांनी श्री खाटेर यांच्या आज पर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे अन्न छत्र मंडळाचे सदस्य यांचे सह एस. वी. मॉल चे जयराज कदम, योगेश सोरटे , मा. सरपंच महेश सोरटे, मा. सरपंच राजेंद्र फलफले, अक्षय सोरटे , दीपक थोरबोले, बाळासाहेब नरारे सर,लष्कर सर,दत्ता रेगुडे , संतोष वारे , आशिष बोरा , चंद्रकांत कालदाते, विजय बरिदे यांचे सह रांगोळी स्पर्धेचे विजेते , डान्स स्पर्धेचे विजेते यांचे सह त्यांचे सर्व पालक व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन करताना शेखर जोगळेकर यांनी खाटेर यांचे कार्य सविस्तर सर्वासमोर मांडले…



