हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक काम कौतुकास्पद – तहसीलदार शिल्पा ठोकडे

करमाळा (दि.२) – करमाळा शहरातील नगर परिषदेची कै.नामदेवराव जगताप उर्दू शाळेत आज सी.सी.टीव्ही कॅमेरेचा शुभारंभ करमाळा तहसील कार्यालयाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक काम कौतुकास्पद असल्याचे वक्तव्य तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक तथा हाजी हाशमोद्दीन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अल्ताफ शेठ तांबोळी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख, मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर, पत्रकार नासीर कबीर, पत्रकार अशफाक सय्यद , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीर शेठ तांबोळी, करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, मुजावर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पुढे बोलताना तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या की, तांबोळी ट्रस्टच्या माध्यमातून उर्दू शाळेत सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून याचा शहरातील विविध सामाजिक संस्थेत काम करणाऱ्यांनी आदर्श घेऊन असेच सामाजिक उपक्रम राबवावे असे आवाहन केले असून या शाळेत मुलींची संख्या जास्त असल्याचा मला व्यक्तीश:आनंद झाला व विविध स्पर्धेत मुलींनी यश संपादन केले असून त्यांना बक्षीस वितरण करण्याचे भाग्य मला लाभले असे ते यावेळी म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बोलताना नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी म्हणाले की, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,भारत रत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सी सी टीव्ही कॅमेरे बसविले तर कोवीड काळात सर्व सामान्य नागरिकांना केलेली मदत असो किंवा दिवाळी सणाच्या वेळी मिठाई चे वाटप असो, रमजान ईद च्या वेळी शिधा वाटप तसेच रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका असा चढता उपक्रम असून सर्व समाजाला घेऊन या ट्रस्टच्या माध्यमातून काम करत आहे असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे व मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या शुभहस्ते शाळेत विविध स्पर्धांमध्ये यश मिळालेल्या कु.शायस्ता शेख,कु.लायजा कुरेशी,मिस्बाह कुरेशी, इकरा मजहर शेख,जोया कुरेशी,हादीया जनवाडकर,यांचा ट्रॉफी व मेडल देऊन सन्मान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक जमादार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर सिकंदर शेख, सोहेल पठाण,मुस्तकीम पठाण, समीर दाऊद शेख,नदीम शेख,आयान बेग, वाजीद शेख,कादर शेख,इंदाज वस्ताद, अफरोज पठाण, मौलाना सिकंदर, अमीन बेग, असिम बेग, अकबर बेग, समीर वस्ताद,अकील शेख,शुकूर शेख, आदी जणांनी परिश्रम घेतले





