सोलापूर-पुणे पॅसेंजर आजपासून सुरू – केम येथे ड्रायव्हरचा सत्कार
केम ( प्रतिनिधी – संजय जाधव) : कोरोनामुळे गेले दोन वर्ष बंद असलेली सोलापूर-पुणे पॅसेंजर आज (दि.१५) पासून सुरू झाली आहे. याबद्दल केम प्रवासी संघटनेचे वतीने आज या गाडीचे स्वागत करण्यात आले व या गाडिचे ड्रायव्हर श्री शर्मा व यादव यांचा केम प्रवासी संघटनेच्या वतीने केम स्टेशनवर सत्कार करण्यात आला.
गेले दोन वर्ष झाले रेल्वे नसल्याने प्रवाशांची विद्यार्थी यांची गैर सोय झाली होती. आज पासून सोलापूर पुणे पॅसेंजर सुरू झाली त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.पहिल्याच दिवशी केम येथून २५ प्रवाशांनी या गाडिने प्रवास केला यावेळी प्रवाशातून आनंद व्यक्त केला जात आहे.
पॅसेंजरच्या ड्रायव्हर च्या सत्काराच्या वेळी
प्रवासी संघटने अध्यक्ष विजय ओहोळ,सचिव सागर राजे तळेकर खजिनदार महादेव पाटमास, भाजप चे तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, सदस्य सचिन रणश्रृंगारे, नागनाथ गुरव, अजुंन अवघडे, ओंकार गिराम सूरज गुरव, दत्तात्रय तळेकर आदीजन उपस्थित होते.
पुणे-सोलापूर-पुणे ही पॅसेंजर गाडी पुण्याहून रात्री 11 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी ती सकाळी 7.55 ला सोलापूरला पोहोचेल व सोलापूर स्टेशनवरून दुसऱ्या दिवशी हीच गाडी 11.40 ला सुटून पुण्याकडे धावेल व पुणे येथे सायंकाळी 7:25 ला पोहोचेल.
प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष विजय ओहोळ म्हणाले की, हैदराबाद मुंबई व मुंबई हैदराबाद व सोलापूरला जाणारी सकाळची एक्सप्रेस या गाडयाना थांबा मिळण्यासाठी केम ग्रामस्थ प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी यांच्या वतीने लढा चालू राहणार आहे.