नवसाला चला म्हटल्याने सुनेला दगडाने मारहाण
करमाळा / संदेश प्रतिनधी
करमाळा : आपणाला दोन मुली झाल्या आहेत, त्यामुळे गागरगावला जाऊन नवस फेडू; असे म्हणणाऱ्या सुनेला सासू-सासरे व नवऱ्याने दगडाने व हाताने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार २४ ऑक्टोबरला दुपारी साडेतीन वाजता भगतवाडी ते गागरगाव रस्त्यावर घडला आहे.
या प्रकरणी योगिता नामदेव धुमाळ (रा. भगतवाडी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की मला दोन मुली झाल्याने त्यांचा नवस गागरगाव, ता. इंदापूर येथील देवाला फेडायचा होता. त्यामुळे जीपमध्ये मी, माझे पती नामदेव धुमाळ, सासरा मच्छिंद्र धुमाळ, सासू शालन धुमाळ असे निघालो. परंतु मधुनच या सर्वांनी आम्हाला नवस फेडायचा नाही, तुझे तु जा व माघारी येऊ नको.. असे म्हणून दगडाने व चापटाने बेदम मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.