केम येथील ऊत्तरेश्वर मंदिरात स्वातंत्र्यदिन व गोकुळाष्टमीनिमित्त विशेष सजावट

केम(संजय जाधव): स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) व गोकुळाष्टमीनिमित्त केम(ता.करमाळा) येथील ऊत्तरेश्वर देवस्थानातील शिवलिंगाची तिरंगा आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमेची आकर्षक अशी सजावट करण्यात आली.

ही सजावट पुजारी भैय्या मोकाशी, कृष्णा गुरव, तात्या गुरव व शंकर देवकर यांनी केली. सजावटीची संकल्पना भैय्या मोकाशी यांची होती. या निमित्ताने गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.

मंदिरात विविध सणानिमित्त शिवलिंगाची वेगवेगळ्या प्रकारे सजावट करण्याची परंपरा असून, त्याच परंपरेनुसार यंदा ही विशेष सजावट करण्यात आली.




