नागपंचमीनिमित्त ऊत्तरेश्वर मंदिरात करण्यात आली आकर्षक सजावट

केम(संजय जाधव): केम (ता.करमाळा)येथील जागृत तीर्थस्थळ श्री ऊत्तरेश्वर देवस्थानात नागपंचमीच्या निमित्ताने शिवलिंगाची पानांनी मखर स्वरूपात अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली.
ही मनोहारी आरास मंदिराचे पुजारी कृष्णा गुरव, तात्या गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारली. दर सोमवारी श्री ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगाची विविध रूपात सजावट केली जाते. मात्र, नागपंचमीच्या निमित्ताने खास पानांची मकर सजावट करून फुलांची आरासदेखील करण्यात आली.
आज नागपंचमीच्या दिवशी महिला भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती आणि दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
“दर सोमवारी वेगवेगळ्या रूपात श्री ऊत्तरेश्वर बाबांची पूजा केली जाते. यंदा नागपंचमीला पानांच्या मकराची आरास आणि फुलांची सजावट पाहून आमचे मन प्रफुल्लित झाले.”
— सौ. सारिका कोरे, सरपंच, केम