धवल क्रांतीचे प्रणेते दिपक देशमुख यांचा विशेष सन्मान

करमाळा(ता.22):अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सोलापूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात भक्कम पायाभरणी करणारे व करमाळा तालुक्यातील धवल क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे लोकविकास डेअरीचे अध्यक्ष दीपक आबा देशमुख यांचा विशेष सन्मान आयोजित केला आहे.

लोकविकास डेअरीने यशस्वी १४ वर्षे पूर्ण करताना तब्बल १३ हजार लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला ॲड. डॉ. बाबुराव हिरडे (अध्यक्ष, ग्रामसुधार समिती करमाळा), भूषण लुंकड (प्रसिद्ध व्यापारी, जेऊर) व किरण डोके (महाराष्ट्र शासन उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी व सीईओ, के.डी. एक्सपोर्ट कंपनी कंदर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

हा सत्कार समारंभ सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५ वाजता, सागर अग्रो सेल्स (स्वराज ट्रॅक्टर्स), शेलगाव चौक येथे आयोजित करण्यात आला असून, उपस्थितांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ग्राम सुधार समिती, जिव्हाळा ग्रुप, दीपकआबा देशमुख मित्रपरिवार यांनी केले आहे.
