सर्वोच्च न्यायालयामध्ये ‘विशेष लोकआदालतीचे’ आयोजन – प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवावीत : न्या.एखे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये ‘विशेष लोकआदालत’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालती मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकरांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटवावीत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी तसेच सचिव न्या.यु.पी देवर्षी तसेच तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा न्या.मिना एखे यांनी केले आहे.
ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात. या लोकअदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा अभाषि पद्धतीने सहभागी होऊ शकतात. जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक आदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर किंवा तालुका विधी सेवा समिती, करमाळा यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी तसेच सचिव यु.पी देवर्षी तसेच तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा न्या.मिना एखे यांनी केले आहे.



