दिवाळीनिमित्त दौंड-कलबुर्गी विशेष अनारक्षित ट्रेन – पारेवाडी, जेऊर, केम स्टेशन वर थांबा

केम (संजय जाधव) – खास दीपावली सणानिमित्त गाडी दौंड ते कलबुर्गी या दोन स्टेशन दरम्यान दोन विविध रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे यातील गाडी क्र. 01421/01422 ही गाडी आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार आहे तर गाडी क्र. 01425/01426 ही गाडी आठवड्यातून गुरुवार आणि रविवार अशी दोन दिवस चालणार आहे. या गाड्यांना भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी या स्टेशनवर थांबा असल्याने करमाळा तालुका व परिसरातील लोकांना या गाडीचा फायदा होणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
गाडी क्र. 01421/01422 दौंड – कलबुर्गी – दौंड अनारक्षित विशेष
गाडी क्र. 01421 दौंड – कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी दि. 28.10.2024 ते 11.11.2024 पर्यंत आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) दौंड रेल्वे स्थानक येथून सकाळी 05.00 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर 08.40 वाजता येणार आणि 11.20 वाजता कलबुर्गी स्थानक येथे पोहोचेल. जेऊर स्थानकावर ही गाडी 6:24 ला तर केम स्थानकावर 6:44 पोहोचेल.
गाडी क्र. 01422 कलबुर्गी -दौंड अनारक्षित विशेष गाडी दि. 28.10.2024 ते 11.11.2024 पर्यंत आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) कलबुर्गी रेल्वे स्थानक येथून संध्याकाळी 04.10 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 06.40 वाजता येणार आणि रात्री 10.20 वाजता दौंड स्थानक येथे पोहोचेल. केम स्थानकावर ही गाडी 8:09: ला तर जेऊर स्थानकावर 8:29 ला पोहोचेल.

गाडी क्र. 01425/01426 दौंड – कलबुर्गी – दौंड अनारक्षित विशेष
गाडी क्र. 01425 दौंड – कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी दि. 27.10.2024 ते 10.11.2024 पर्यंत आठवड्यातून दोन दिवस (गुरुवार आणि रविवार) दौंड रेल्वे स्थानक येथून सकाळी 05.00 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर 08.40 वाजता येणार आणि 11.20 वाजता कलबुर्गी स्थानक येथे पोहोचेल. जेऊर स्थानकावर ही गाडी 6:24 ला तर केम स्थानकावर 6:44 ला पोहोचेल.
गाडी क्र. 01426 कलबुर्गी -दौंड अनारक्षित विशेष गाडी दि. 31.10.2024 ते 07.11.2024 पर्यंत आठवड्यातून दोन दिवस (गुरुवार आणि रविवार) कलबुर्गी रेल्वे स्थानक येथून संध्याकाळी 08.30 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर रात्री 10.55 वाजता येणार आणि मध्य रात्री 02.30 वाजता दौंड स्थानक येथे पोहोचेल. केम स्थानकावर ही गाडी 0:45: ला तर जेऊर स्थानकावर 1:02 ला पोहोचेल.
Relevant News : खास दिवाळीसाठी मुंबई-लातूर साप्ताहिक विशेष ट्रेन सुरू होणार – करमाळा तालुक्यातील ‘या’ स्टेशनवर असणार थांबा

थांबे: दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोती, दुधनी, गाणगापूर आणि कलबुर्गी असे असतील.
संरचना: 10 अनारक्षित 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन. एकूण 12 कोच असतील.
या रेल्वे सेवेमुळे दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ या परिसरातील नागरिकांना सकाळच्या वेळी सोलापूर आणि पुढे जाऊन अक्कलकोट, गाणगापूरकडे सुद्धा प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी परतीचा प्रवास करता येता येईल. त्यामुळे मासिक पासधारक, विद्यार्थी, कर्मचारी,छोटे मोठे दुकानदार, व्यावसायिक, भक्त गण, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद मध्ये कामानिमित्त जाणारे नागरिक, सोलापूर मधील रुग्णालय मध्ये जाणारे रुग्ण – त्यांचे नातेवाईक या सर्वांची सोय होणार आहे. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार माहिती http://www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲप वर मिळेल.
दौंड गुलबर्गा दौंड शटल ही रेल्वे सेवा २८ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. सध्या दिवाळी सणाकरिता हंगामी स्वरूपात मंजुरी मिळाली असती तरीही केली असली तरीही चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढे सातत्याने चालू राहू शकते. ही रेल्वे सेवा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार.
– प्रा. प्रशांत सावंत, केम, ता.करमाळा जि. सोलापूर




