करमाळा येथील संविधान जागर रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
करमाळा : काल (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त करमाळा येथील आंबेडकरवादी चळवळी मार्फत करमाळा शहरातून संविधान जागर रॅली काढण्यात आली. या रॅलीला शहरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यात आला.
या रॅलीचे उद्घाटन नायब तहसीलदार विजयकुमार जाधव,सहाय्यक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे, महसुलचे नायब तहसीलदार सुभाष बदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी 11 वाजता करमाळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून या रॅलीची सुरुवात झाली व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापाशी या रॅलीचा समारोप झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून या रॅली मार्फत महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
ढोल ताशांच्या पथकामध्ये ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी, युवकांनी सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेतले होते. यावेळी संविधानाच्या प्रतिमेची रॅलीद्वारा मिरवणूक काढण्यात आली. या रॅली मध्ये महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.