जिजाऊ जयंतीनिमित्त केम येथे एसएससी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन
केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील केम येथे अध्यक्ष सागर राजे तळेकर यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त एसएससी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन राजाभाऊ तळेकर विद्यालय येथे करण्यात आले परीक्षाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन एपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका तळेकर पै महावीर आबा तळेकर चेअरमन सुदर्शन तळेकर शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष महेश तळेकर सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ च्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ तळेकर सर यांनी केले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मनोज तळेकर यांनी उपक्रमाचे कौतुक करीत दहावीच्या विद्यार्थ्यांना या चा बोर्डाच्या परीक्षेत लाभ होईल तर सुयश क्लासेसचे संस्थापक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व वसंत तळेकर सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत असेच उपक्रम इतर मंडळानी राबविण्यात यावे
ए पी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका तळेकर म्हणाले दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेला शुभेच्छा देत गुणवत्ता यादीत विद्यार्थी आले तर त्यांचा मोठा सत्कार सोहळा एपी ग्रुपच्या वतीने करणार असल्याचे जाहीर केले या टॅलेंट सर्च परीक्षेत श्री उत्तरेश्वर हायस्कूल, राजाभाऊ तळेकर विद्यालय ,शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय, नूतन विद्यालयातील एसएससीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या परीक्षेला परीक्षक म्हणून सर्व शाळेतील शिक्षकांनी काम पाहिले
ही परीक्षा गणित भाग एक व भाग दोन तसेच विज्ञान भाग एक व दोन अशी परीक्षा असून या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना कै.पांडुरंग गेणबा तळेकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख 5001 रुपयाचे बक्षीस देऊन तसेच द्वितीय क्रमांक विद्यार्थ्याला दत्ताभाऊ तळेकर यांच्याकडून ट्रॉफी प्रमाणपत्र व 3001 रुपयाचे रोख बक्षीस तसेच तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्याला कै. कमल प्रल्हाद तळेकर यांच्या स्मरणात ट्रॉफी प्रमाणपत्र व 2001 रुपयाचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात येईल तसेच अरुण उघडे सर ,सुदाम कुरडे सर, वाघमारे सर ,जाधव सर, शंकर ढगे सर यांच्याकडून प्रत्येकी 501 रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येतील