एस.टी.तील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला परमेश्वर समजून सेवा करावी : डॉ.ॲड.बाबूराव हिरडे - Saptahik Sandesh

एस.टी.तील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला परमेश्वर समजून सेवा करावी : डॉ.ॲड.बाबूराव हिरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : एस.टी.तील कर्मचाऱ्यांनी आपण स्वत: नोकरी करतो हे न समजता आपण मालक आहोत आणि एस.टी.ही आपली स्वतःची मालमत्ता आहे असे समजुनच कार्यरत राहिले तर निश्चीत प्रकारे एस.टी. ची प्रगती चांगली होऊ‌ शकेल, असे मत ग्रामसुधार समितिचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.

एस.टी.महामंडळामार्फत ‘इंधन बचत’ व ‘सामाजिक सुरक्षीतता सप्ताह’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.ॲड.हिरडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा आगार प्रमुख श्री.होनराव हे होते. यावेळी व्यासपीठावर स्थानक चार्ज प्रमुख श्री.कदम, वरिष्ठ लिपिक श्री.सरडे, अरुण घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ॲड.हिरडे म्हणाले कि, एस.टी.तील ग्राहक हा ग्राहक‌ नसुन, तो एक आपला परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करण हे आपल आद्य कर्तव्य आहे, असे समजुन जर आपण दैनंदिन वाटचाल केली तर एस.टी.आणि ग्राहक यांच‌ नातं सुखकर होऊ शकतो आणि एस.टी.कडे येणाऱ्या ग्राहकांचा ओढा वाढु शकेल. हि संस्था टिकणे फार गरजेचे आहे. महिला, ज्येष्ट नागरिक,अपंग आणि विद्यार्थी या सर्वांची सेवा करण्याच काम या एस.टी. च्या माध्यमातुन होत आणि अशी एस.टी. जी जगली पाहिजे, त्यामुळे भविष्यामध्ये एस.टी. च जे नाव आहे ते उज्वल करण्यासाठी प्रत्येकान झोकुन देउन काम केल पाहिजे, असे मत ग्रामसुधार समितिचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सरडे यांनी केले. तर आभार श्री. घोलप यांनी मांडले. याप्रसंगी करमाळा आगारातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!