२२ ऑगस्टला नवी मुंबई येथे संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन
करमाळा (दि.२१) – येत्या गुरूवारी (दि 22 ऑगस्ट) नवी मुंबई मधील वाशी येथे संभाजी ब्रिगेडचे २७ वे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार असून या राज्यस्तरीय अधिवेशनास करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुहास पोळ यांनी दिली. हे अधिवेशन वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी १० ते सायंकाळी ७ या दरम्यान होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या अधिवेशनास चर्चासत्राचे प्रमुख विषय पुढील प्रमाणे असणार आहेत – उद्योगाची दूरदृष्टी, महाराष्ट्र धर्म काय शिकवतो? , गांधीजींच्या स्वप्नातील भारत , भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही, इ.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार छत्रपती शाहू महाराज असणार आहेत. शाहू महाराज व विजयसिंह मोहिते पाटील यांचा शाही सन्मान शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे .तसेच राजेंद्र पवार (चेअरमन ए डी टी बारामती) .विलास शिंदे (एम डी सह्याद्री फार्म), सतिश मगर (सुप्रसिद्ध उद्योजक ) यांना विश्वभूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रोहित पवार(आमदार) ,डाॅ अमोल कोल्हे ( खासदार ) ,सयाजी शिंदे (अध्यक्ष सह्याद्री देवराई ), गौरव मोरे (अभिनेता), श्रीराम पवार (जेष्ठ संपादक),निरंजन टकले (निर्भिड पत्रकार ), प्रफुल्ल वानखेडे(उद्योजक )ज्ञानेश महाराव (जेष्ठ विचारवंत) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या संकल्पनेतून “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूख आपला” या घोषवाक्यामुळे संभाजी ब्रिगेड अर्थकारणावर लक्ष केंद्रित करून समाजाला नवी दिशा देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या राज्यस्तरीय अधिवेशनास करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ, बाळासाहेब तोरमल, रामहरी मोरे,सागर साखरे नानासाहेब पोळ, पांडुरंग घाडगे, निलेश पाटील यांनी दिली