कमलाई फेस्टिवल : करमाळ्यात राज्यस्तरीय डान्स स्पर्धांचे आयोजन

करमाळा : नवरात्र उत्सवानिमित्त श्री देवीचामाळ येथील राजेरावरंभा मंडळाच्यावतीने यंदाही श्री कमलाई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व राज्यस्तरीय डान्स स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. कमलाई फेस्टिव्हलचे हे सलग 19 वे वर्ष आहे. यंदाचे फेस्टिव्हल 26 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, विविध दिवसांसाठी खास कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

यामध्ये खालीलप्रमाणे कार्यक्रम व स्पर्धांचे नियोजन आहे :
- 26 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सात या वेळेत रांगोळी स्पर्धा होणार असून, यात प्रथम बक्षीस 5001 रुपये, द्वितीय 3001 रुपये तर तृतीय 1001 रुपये असे ठेवण्यात आले आहे.
- 27 सप्टेंबर व 28 सप्टेंबर रोजी सायं. सात ते दहा वेळेत खुल्या गटातील राज्यस्तरीय डान्स स्पर्धा होणार असून, यात प्रथम बक्षीस 21,001 रुपये, द्वितीय 15,001 रुपये व तृतीय 11,001 रुपये असेल.
- 29 सप्टेंबर रोजी सायं. सात ते दहा वेळेत भव्य ग्रुप डान्स स्पर्धा होणार असून, यात प्रथम बक्षीस 11,001 रुपये, द्वितीय 7001 रुपये व तृतीय 5001 रुपये असेल.
- 30 सप्टेंबर रोजी सायं. सात ते दहा या वेळेत बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम देवीचामाळ येथील वाहन पार्किंग मैदानात होणार आहे. प्रेक्षकांमधून दररोज एका महिलेला पैठणी भेट दिली जाणार आहे असल्याचे देखील आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



