राज्यस्तरीय भक्तीगीत स्पर्धा : सुरताल संगीत विद्यालयाचा उपक्रम

करमाळा, दि. 16 – आयएसओ मानांकन प्राप्त सुरताल संगीत विद्यालय, करमाळा (जि. सोलापूर) यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त राज्यस्तरीय शालेय भक्तीगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी दिली.
अधिक माहिती देताना ते म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि भारतीय भक्तीपरंपरेचे जतन करणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली असून, स्पर्धकांनी २ ते ४ मिनिटांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे सहभाग नोंदवायचा आहे.

स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत –
प्रथम बक्षीस : ₹3001
द्वितीय बक्षीस : ₹2001
तृतीय बक्षीस : ₹1001
उत्तेजनार्थ बक्षिसे (2-3 विजेत्यांसाठी) : प्रत्येकी ₹501
सर्व स्पर्धकांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
- स्पर्धेच्या अटी व नियम:
- 1. स्पर्धक इयत्ता ५वी ते १०वीपर्यंतचा असावा.
- 2. भक्तीगीत मराठी किंवा हिंदी भाषेत असावे.
- 3. मुख्य गायक एकच असावा; कोरससाठी कमाल ३ आणि साथ संगतीसाठी कमाल ३ विद्यार्थी असू शकतात.
- 4. स्पर्धेचा निकाल आषाढी एकादशी नंतर जाहीर केला जाईल
- 5. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वतंत्ररित्या आयोजित करण्यात येणार असून, त्याचे ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल.
- 6. सहभागी व्हिडिओ आषाढी एकादशीच्या सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच स्वीकारले जातील.
- 7. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- स्पर्धेत सहभागासाठी आवश्यक आहे:
- २ ते ४ मिनिटांचा गायन व्हिडिओ
शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र व वरील दोन्ही गोष्टी खालीलपैकी एका मोबाईल नंबरवर पाठवाव्यात –
संपर्क: 9422446841, 9423537415, 9970196004
स्पर्धेसाठी गुगल फॉर्म लिंक (अनिवार्य):
स्पर्धा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा







