अंजनडोह येथील दलित आत्महत्येस कारणीभूत आरोपीला अटक होत केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाला निवेदन - Saptahik Sandesh

अंजनडोह येथील दलित आत्महत्येस कारणीभूत आरोपीला अटक होत केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाला निवेदन

करमाळा (संदेश प्रतिनिधी)अंजनडोह येथील दलित आत्महत्येस कारणीभूत आरोपीला अटक होत नसल्याने आरपीआयचे नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुणे येथे केंद्रीय अनुसूचित जाती आयोग संचालक कुमार नित्यानंद, समाज कल्याण उपायुक्त श्री. कदम-पाटील यांना भेटून न्याय मिळवून देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तब्बल एक महिना उलटूनही अंजनडोह (ता. करमाळा) येथील दलित व्यक्तीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस करमाळा पोलिस प्रशासनाने अटक केलेली नसून त्यासाठी आंदोलने करूनही प्रशासन कसलीही दाद न देता आरोपींना पाठीशी घालत आहे ,आत्महत्ये पूर्वी मृत युवकाने व्हिडीओ बनवून आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे घेतली आहेत हा प्रथमदर्शनी पुरावा देखील आहे.यामुळे अंजनडोह येथील दलित समाज व्यथित अन भयभीत असून पीडितांना न्याय देण्यात यावा.


यास दोन्ही ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पीडितांना न्याय मिळेपर्यंत प्रशासन आपल्या सोबत आहे असे आश्वासित केल्याची माहिती नागेश कांबळे यांनी दिली.

यावेळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे राज्य कार्याध्यक्ष,मा निलेश बबनराव वाघमारे,लहुजी शक्ती सेनेच्या लोपताई भगत,लहुजी क्रांती सेनेचे मनोज आप्पा क्षीरसागर विजय दादा रणदिवे नाना कांबळे सागर जगताप महादेव रणदिवे कैलास रणदिवे दीपक रणदिवे पप्पू रोकडे, नवनाथ रणदिवे ,पोपट रोकडे, बंडू शिरसकर, नितीन चव्हाण,शरद रणदिवे,केरबा रणदिवे,प्रदीप रणदिवे इ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!