महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी करमाळ्यात विविध संघटनांकडून निवेदन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता. ३१ : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या मृत्यूप्रकरणी सत्य परिस्थिती उजेडात यावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी करमाळा येथे आज विविध संस्था व संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत — फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत करण्यात यावी, सरकारने प्रशासन अथवा राजकीय क्षेत्रातील दोषींना पाठीशी घालू नये, सदर प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा तसेच मृत महिला डॉक्टरच्या प्रकरणी व नेहमीच पीडित महिलांविरोधात वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पदावरून तात्काळ हटविण्यात यावे.

या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या वेळी ॲड. सविता शिंदे, डॉ. अमोल दुरंदे, अमरजीत साळुंखे, हनुमंत मांढरे, सुधाकर लावंड, साहेबराव वाघमारे, राजाभाऊ कदम, यशपाल कांबळे, उत्तरेश्वर कांबळे, पद्मजा इंगवले, विजयमाला चवरे, प्रा. गोवर्धन चवरे, दादा ढेरे, दादासाहेब लबडे, अंगद देवकते, चंद्रकांत साळवे, प्रमोद कुंभार, शहाजी धेंडे, ॲड. अलीम पठाण, डॉ. राम बिनवडे, डॉ. बालाजी खटके, डॉ. संतोष आटोळे, डॉ. वर्षा करंजकर, औदुंबर मोरे, रामकृष्ण नायकोडे, ॲड. योगेश शिंपी, ॲड.अंकिता वेदपाठक, स्वाती सपकाळ, देवराव सुकळे, एलिझाबेथ असादे आदी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नायब तहसीलदार श्री. काझी यांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारले.





 
                       
                      