शिवीगाळ व मारहाण प्रकरण – आवाटीतील युवकावर काठीने हल्ला..

करमाळा : आवाटी येथे किरकोळ वादातून एकाने दुसऱ्या युवकावर शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी मनोज सोमनाथ नलवडे (वय ३२, रा. आवाटी) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, मनोज नलवडे हे गावातील बसस्टँडजवळ उभे असताना, गावातीलच हसन उर्फ आरबाज मेहबुब सय्यद यांने चुलते संजय नलवडे यांच्याशी फोनवर बोलताना शिव्या दिल्या त्याची विचारणा करताच, संशयित आरोपी हसन याने मनोज यांना देखील शिवीगाळ केली व हातातील काठीने त्यांच्या पाठीवर मारहाण केली. यामुळे मनोज यांना दुखापत झाली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी हसन उर्फ आरबाज मेहबुब सय्यद यांनी मनोज सोमनाथ नलवडे (वय ३२, रा. आवाटी) याच्या विरोधात काठीने मारहाण केल्याची फिर्याद दिली असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

