धर्मवीर संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवले विविध पक्षांचे निरीक्षण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : धर्मवीर संभाजी विद्यालयात पर्यावरण सेवा योजना विविध सातत्यापुर्ण राबवत आहे; 2015 पासुन हे विद्यालय विविध उपक्रम राबवत आहे. यामध्ये रानभाज्यांचा अभ्यास करणे, पर्जन्यमान मोजणे, रेनवॉटर हार्वेस्टींग, नर्सरी, पक्षी निरीक्षण, इत्यादी योजना ही शाळा सातत्याने राबवत आहे. पर्यावरण सेवा योजनेचे उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक बापु निळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण योजनेचे प्रमुख हरिदास काळे सर यांनी दोन वर्षासाठी पंन्नास विद्यार्थ्यांची निवड करुन हे उपक्रम राबवत आहेत.

या उपक्रमासाठी माजी पुणे विभाग प्रमुख गणेश सातव यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने हे उपक्रम राबवण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात ही शाळा नेहमी आग्रसर असते. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पक्षी निरीक्षणाचे नियोजन करण्यात आले होते. नियोजना प्रमाणे गौंडरे परीसर निमगाव परिसर व सिना कोळेगाव प्रकल्प परिसर निरीक्षण केले असता, या ठिकाणी बुलबुल, खंड्या, पारवा, होला, बगळा, भुरा, बगळा, काळा, बगळा, कोतवाल, पाणकोंबडी, चिमणी, चस्मेवाला, चिरक, साळुंकी व असे 21 प्रकारचे पक्षी विद्यार्थ्यांना दिसुन आले. दुर्भिन नसल्यामुळे लांब पक्षाचे निरीक्षण करता आले नाही. हे उपक्रम राबवण्यासाठी या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे व बापु तांबोळी तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या विद्यालयाचे कौतुक सर्व स्थरातुन होत आहे.