तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न – करमाळा तालुक्यातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखविली इंग्रजीची चुणूक
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा,शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा व इंग्लिश लँग्वेज टीचर् असोसिएशन, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे २७ जुलैला आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेतली गेली. पहिला गट – इ.पाचवी-सहावी, दूसरा गट इ सातवी-आठवी तर तिसरा गट इ. नववी-दहावी. स्पर्धेच्या दिवशीच बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
- गट पहिला – इ 5 वी 6 वी
- 1) प्रथम क्रमांक – वैभव अरुण कोकरे – त्रिमूर्ती विद्यालय टाकळी
- 2) द्वितीय क्रमांक – श्रद्धा योगेश धर्माधिकारी – कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा
- 3) तृतीय क्रमांक – पृथ्वीराज विनोद बाबर – जि.प शाळा, रावगांव
- 4) उत्तेजनार्थ – आकांक्षा तानाजी क्षिरसागर – जि प शाळा, पोफळज
- 5) उत्तेजनार्थ – अनन्या दत्तप्रसाद मंजरतकर – भारत हायस्कुल, जेऊर
- गट दुसरा – इ 7 वी 8 वी
- 1) प्रथम क्रमांक – श्रावणी मारुती गुटाळ – श्रीम रा बा सुराणा विद्यालय चिखलठाण
- 2) द्वितीय क्रमांक – अपूर्वा जनार्दन पवार – गिरधरदास देवी विद्यालय करमाळा
- 3) तृतीय क्रमांक – अक्षता प्रमोद वेदपाठक – साडे हायस्कुल, साडे
- 4) उत्तेजनार्थ – आलिशा अस्लम शेख – कमलादेवी कन्या विद्या करमाळा
- 5) उत्तेजनार्थ -योगिता विकास पवार – वामनराव बदे विद्या उमरड
- गट तिसरा – इ .9 वी 10 वी
- 1 ) प्रथम क्रमांक – प्रगती किशोर चव्हाण – साडे हाय स्कुल, साडे
- 2) द्वितीय क्रमांक – नक्षत्रा अमोल बागल – प्रगती विद्यालय,मांगी
- 3) तृतीय क्रमांक – प्रांजली बाळकृष्ण लावंड – महात्मा गांधी विद्यालय करमाळा
- 4) उत्तेजनार्थ – आयेशा मुलाणी – शरदचंद्रजी पवार विद्यालय, वाशिंबे
- 5) उत्तेजनार्थ – स्नेहल गरुड – राजेश्वर विद्यालय राजुरी
या स्पर्धेस विविध परीक्षकांनी परिक्षणाचे काम पाहिले. यात बार्शी येथील श्रीमती लक्ष्मी तोरडमल, धनाजी राऊत,विश्वास चौधरी , सचिन उकीरडे, शशिकांत देशमुख,कर्जत येथील प्रा. दिपक लांगोरे, प्रा.परशुराम दळवी. परांडा येथील प्रा. शिवशंकर अंकुश, प्रा. दत्तात्रय थोरात करमाळा येथील प्रा. सुनिल शिंदे, प्रा. विजय वारूळे, दादासाहेब खराडे , अमिन शेख, मुख्याध्यापिका एलिझाबेथ आसादे, मुख्याध्यापिका सुनिता मोहिते, मेघाली शेटे, विद्या एकतपुरे यांचा समावेश होता.
हा समारंभ यशकल्यानी भवन करमाळा प्रा.गणेश करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. तृप्ती अंधारे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षण अधिकारी श्री.राजकुमार पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड.बाबुराव हिरडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षक, पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.