विद्यार्थांनी भविष्याला अभ्यास व जिद्दीच्या जोरावर सक्षमपणे सामोरे जावे : न्यायाधीश मिना एखे
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.22 : विद्यार्थांनी भविष्याला अभ्यास व जिद्दीच्या जोरावर सक्षमपणे सामोरे जावे,असे आवाहन करमाळा येथील दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायालयाच्या न्यायाधीश मिना एखे यांनी केले. युवा दिनाच्या निमित्ताने तालुका विधीसेवा समिती व करमाळा वकील संघ यांचे विद्यमाने कायदा विषयक जागरूकता , रॅगिंग वाहतुकीचे नियम आणि आंतरराष्ट्रीय युवा दिन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश आर.ए.शिवरात्री, न्यायाधीश भार्गवी भोसले, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, वकील संघाचे अध्यक्ष ॲड दत्तात्रय सोनवणे, वकील संघाचे सदस्य ॲड. बलवंत राऊत, ॲड.डॉ.बाबूराव हिरडे आदीजण उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना न्यायाधीश एखे म्हणाल्या की..युवकांनी युवा स्थितीत स्वप्न पाहून ते साकार करण्यासाठी मेहनत घेतली पाहीजे. तरच उत्तम भविष्य घडणार आहे..असेही त्यांनी म्हटले आहे.
व्याख्यानामध्ये ॲड. बी.आर.राऊत यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग कशा प्रकारे केले जाते याची उदाहरणे देऊन अँटी रॅगिंग कायद्यांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीचे प्रमुख प्रा.गौतम खरात यांनी केले सूत्रसंचालन प्रा. नितीन तळपाडे यांनी केले तर प्रा. प्रदीप मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी करमाळा न्यायालयातील नानासाहेब घाडगे, रामेश्वर खराडे, गणेश सावंत तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. प्रमोद शेटे, प्रा. अभिमन्यू माने सुप्रिया पवार, राम घोडके, नवनाथ बिनवडे आणि बापू माने यांनी विशेष परिश्रम घेतले.