अठरा तास अभ्यास करा व बक्षीस मिळवा-मराठा फोर्ट्स चा  उपक्रम

0

करमाळा,ता.21: विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 132 व्या जयंतीनिमित्त मराठा फोर्ट्स आयोजित एकदिवसीय 18 तास अभ्यास अभियान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात यशस्वी होणार्यांना 5000/-,3000/-,व 2000/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले की,नाव नोंदणी दिनांक 20 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे..वाचन किंवा लेखन स्व इच्छेनुसार प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी किमान आठ तास सहभाग अपेक्षित आहे. मोबाईल वापरण्यास सक्त मनाई केली आहे.सकाळी उशीर झाल्यास सकाळी 9:00 पर्यंत त्यानंतर सहभागी होता येणार नाही.

यामध्ये ३ क्रमांक काढले जाणार आहेत. प्रथम क्रमांकास रु 5000/- व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांकास रु 3000/- व प्रमाणपत्र , तृतीय क्रमांकासाठी रु 2000/- व प्रमाणपत्र अशी पारितोषिके आहेत.

स्पर्धेची रुपरेषा : 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6:00 वा सुरु, स 9 ते 9:20 चहा, दु 12:30 ते 1:00 जेवण, सायं 5 ते 5:30 चहा, रात्री 8:30 ते 9:15 जेवण रात्री 12:00 वा समाप्ती व दि- रविवार दिनांक- 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6:00 ते रात्री 12:00 पर्यंत चालेल

स्पर्धेचे  ठिकाण व प्रवेश फी – यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा हे आहे. यासाठी प्रवेश शुल्क नाममात्र रु 100/- रू. ठेवले आहे.

संपर्क क्रमांक – यासाठी गणेश जाधव (सर) 963777969, रणजीत काटेकर 7038666821, ऋतिक रणवरे 9607194445 सहभागी होण्याची इच्छा असूनही प्रवेश शुल्क भरणे शक्य न झाल्यास समक्ष भेटावे असेही अवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!