'सुभाष चौक' चे नाव श्रीराम चौक करावे - मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन -

‘सुभाष चौक’ चे नाव श्रीराम चौक करावे – मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील सुभाष चौकाचे नामांतर करून त्याचे नामकरण “श्रीराम चौक” असे करा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल  यांनी काल (दि.९) आपल्या निवदन पत्राने करमाळा नगर पालिकेचेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या कडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर चौकाचा इतिहास पाहिला असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सुभाष चौक नामकरण झालेबाबतचा अथवा तसे कारण असण्याचा कुठलाही कागदोपत्री अथवा प्रचलित पुरावा उपलब्ध नाही-अशा परिस्थितीमध्ये २२ जानेवरी रोजी श्रीराम जन्मभुमी तिर्थक्षेत्र अयोध्या येथे होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमीत्त करमाळा येथील सुभाष चौक येथे करमाळ्यातील हजारो रामभक्त, कारसेवक त्यांच्या भावना व अस्मितेचा प्रश्न म्हणून सुभाष चौकाचे नामांतर होवून श्रीराम चौक असे नामकरण होणेबाबत आदेशीत व्हावे.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जितेश शेठ कटारिया ॲड.प्रियाल अग्रवाल, पत्रकार विशाल घोलप, व्यापारी असोशियनचे स्नेहल कटारिया, कपिल मंडलिक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!