करंजे येथील सुभाष सरडे यांचे सर्पदंशाने निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करंजे (ता. करमाळा) येथील सुभाष व्यंकट सरडे (वय -५०) यांचे काल (ता.२१) सायंकाळी साडे पाच वाजता शेतात सर्पदंश होवून निधन झाले. यात हकीकत अशी की, सरडे हे आपले कामकाज उरकून आपल्या घरी आले व जनावरांना चारा आणण्यासाठी जवळच्या शेतात गेले असता तेथे त्यांना सर्पदंश झाला व त्यातच त्यांचे निधन झाले.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे ते स्लिपबॉय म्हणून कामकाज पहात होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक ग्रामस्थ, नागरीक नातेवाईक उपस्थित होते.