करमाळा-कुर्डूवाडी बस नेरले मार्गे सुरु – माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांच्या मागणीला यश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२४) : करमाळा – कुर्डूवाडी बस नेरले मार्गे सुरु झाली आहे. सदरची बस सुरू करण्याची मागणी नेरलेचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी केली होती.

नेरले हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे व गौंडरे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे.गावात दोन विद्यालय व डीसीसी बँकेची शाखा आहे. सीना कोळगाव प्रकल्प जवळच आहे .नेरले वरून गौंडरेला अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेच्या कामासाठी जातात तसेच आवाटी सालसे निमगाव कोळगाव हिसरे हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेचे कामासाठी, प्रकल्पाकडे जाण्यासाठी गौंडरे येथे येतात नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच नागरिकांना कुर्डूवाडी येथून रेल्वेने सोलापूर पुणे मुंबई इतर ठिकाणी जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी जाण्यासाठी एसटीची अत्यंत गरज होती.

त्यामुळे करमाळा कुर्डूवाडी बस हिसरे कोळगाव निमगाव गौंडरे नेरले वर वरकुटे बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळा अशी मागणी नेरले ग्रापं माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी नेरले व गौंडरे ग्रामपंचायत ठराव सह केली होती.नागरिकांच्या मागणीचा व वर्तमानपत्राच्या बातमीचा विचार करून २६ ऑगस्ट रोजी सोमवारी बस सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेरले, गौंडरे, निमगाव, हिवरे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, नागरिकांनी सोमवारपासून कुर्डूवाडी व करमाळा जाण्यासाठी बसने प्रवास करावा असे आवाहन नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.



