करमाळा लोकन्यायालयात २४१ प्रकरणे तडजोडीने निकाली तर ३ कोटी ७९ लाख ६७ हजार रूपये वसूल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथील न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यालयात एकूण २४१ खटले तडजोडीने मिटले असून यामध्ये ३ कोटी ७९ लाख ६७ हजार ०८३ रुपये वसुली झाली आहे. करमाळा न्यायालयात आज (ता.३०) रोजी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व दिवाणी व फौजदारी न्यायालय करमाळा येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते. सदर लोकन्यायालयमध्ये आज रोजी तडजोडीसाठी ठेवलेल्या प्रकरणांची खालील प्रमाणे माहिती.. १) प्रलंबित प्रकरणे 117 तडजोडीने निकाली…त्यामध्ये 3 कोटी 40 लाख 22 हजार 082 रुपये रक्कम वसुली २) दाखल पूर्व 124 प्रकरणे तडजोडीने निकाली…यामध्ये 39 लाख 45 हजार 001 रुपये वसुली झाली आहे.
एकूण निकाली प्रकरणे – 241
एकूण वसूल झालेली रक्कम 3,79,67,083/-
याप्रसंगी पॅनलप्रमुखपदी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायाधीश सौ.मिना एखे तसेच दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायाधीश आर.ए.शिवरात्री हे होते. तसेच पॅनल प्रतिनिधी म्हणून ॲड.विक्रम चौरे व ॲड.लताताई पाटील यांनी काम पाहिले. यावेळी न्यायाधीश सौ.मीना एखे व न्यायाधीश श्री.शिवरात्री यांची यांची भाषणे झाली. याप्रसंगी रामेश्वर खराडे तसेच एस.एल.जाधव यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. यावेळी करमाळा बार असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कॅमेरा हरवला आहे..फोटोग्राफर राजेंद्र झिंजाडे (राज फोटो स्टुडिओ) गायकवाड चौक करमाळा येथून आज रविवार दिनांक 30/04/2023 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता दुकान बंद केल्यानंतर फोटो कॅमेर्याची बॅग दुकानाच्या बाहेरच नजरचुकिने विसरून राहिली आहे. Canon R 24 ×105 lence 50 mm lence,stigar इ. वस्तु आहेत.
या विषयी जरकोणाला काय माहिती मिळाल्यास कृपया या मोबाईल नंबर वर कळवावे. कॅमेरे बॅक माहिती देणारा व्यक्तीस योग्य बक्षीस दिले जाईल.
मो.नं.9921319473 राज झिंजाडे
9881028318 बबन आरणे
Adverties…