विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या – करमाळा शहरातील घटना

करमाळा (दि. ११) : शहरातील कानाडगल्ली येथील वैष्णवी माने (वय – ३०) या विवाहितेने आज (ता. ११) सायंकाळी साडेपाच वाजता राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदर आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वैष्णवीच्या पाठीमागे चार वर्षाचा एक मुलगा, पती, सासू, दीर असा परिवार आहे. अचानक हा प्रकार घडल्याने माने परिवारात दुःखाची छाया पसरली आहे. यात करमाळा पोलीसात आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
“एकच नाव… एकच वेदना… पुन्हा घडू नये तिसरी वैष्णवी..!”
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती आणि सासूला दोन दिवसांची पोलीस कोठडी




