करमाळ्यात उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात : सुजित बागल

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता. ५ : सन २०२५-२६ साठी एनसीसीएफ व नाफेड मार्फत उडीद, मुग आणि सोयाबीन खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे करमाळा तालुक्यातील श्री विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था, करमाळा यांना अधिकृत खरेदी केंद्र म्हणून मंजुरी देण्यात आली आहे.

या केंद्रावर उडीद खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी सन २०२५-२६ च्या पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, आठअ (८अ) उतारा इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या करमाळा मार्केट कमिटीच्या आवारातील डीसीसी बँकेच्या शेजारील कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे सचिव श्री सुजित बागल यांनी केले आहे.

नोंदणी प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संस्थेचे व्यवस्थापक श्री अजिनाथ मोरे (मो. ९४२१० २३२९६) यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. बागल यांनी सांगितले




