लाडकी बहीण योजना करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवणार – सुजित बागल
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांचे आदेशानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावागावात प्रत्येक महिला पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही कार्यकर्ते करणार आहोत अशी माहिती मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रा.सदस्य सुजित तात्या बागल यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, कालच मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे .तसेच योजनेमधील काही अटी पण शिथील करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे काल (दि.२ जुलै) मांगी येथील चार अंगणवाडीमध्ये जवळपास 300, व महिला बचत गटासाठी 100 फॉर्म दिले आहेत. तसेच मागेल त्या महिला लाभार्थ्याना मांगी येथील कमलाई झेरॉक्स मधून फॉर्म देण्यात येणार आहेत. मोलमजुरी करणाऱ्या गरीब कष्टकरी महिलांना गावातच कागदपत्र मिळण्यासाठी व्यवस्था करण्याचेही आमचे प्रयत्न सुरू असुन आमदार संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयातून आतापर्यंत 20 हजार फॉर्म प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांकडे देण्यात आलेले आहेत. महिलांना कागदपत्रांसाठी हेलपाटे न घालता सहजरीत्या फॉर्म कागदपत्र मिळवून द्यायची आम्ही व्यवस्था करणार आहोत.