सुनीलबापू सावंत यांनी तालुका राजकारणात यावे : अभयसिंह जगताप
करमाळा : येथील सावंत गटाचे नेते व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुनीलबापू सावंत यांनी आता तालुका राजकारणात उडी घ्यावी; असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमुख अभयसिंह जगताप यांनी केले.
श्री.सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जगताप बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड. राहुल सावंत, युवा सेनेचे शंभुराजे फरतडे, माजी नगरसेवक संजय सावंत, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय शिंदे, तालुकाप्रमुख देवानंद बागल, राष्ट्रवादीचे हनुमंत मांढरे-पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, देवळालीचे सरपंच धनंजय शिंदे, विकास सोसायटीचे चेअरमन मनोज गोडसे, भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, बाजार समितीचे संचालक वालचंद रोडगे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गायकवाड, सचिन गायकवाड, भरतशेठ दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. जगताप म्हणाले, की सावंत परिवाराचे काम हे सर्वसमावेशक असून सर्वसामान्यांसाठी ते कायम प्रयत्नवादी असतात. त्यांच्या माध्यमातून अनेक कामे केली जात आहेत. हीच कामे मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सुनीलबापू यांनी तालुका कार्यक्षेत्र निवडून कार्यरत व्हावे. त्यांच्या प्रत्येक कार्यात आपण पाठीशी राहू; असेही आश्वासन श्री. जगताप यांनी दिले.
यावेळी अॅड.नवनाथ राखुंडे, अॅड. एस. पी. लुणावत, अॅड. डॉ. बाबुराव हिरडे, गणेश करे-पाटील, विलासराव घुमरे, अल्ताफ तांबोळी, शंभुराजे फरतडे आदींची भाषणे झाली.
यावेळी शहर व तालुक्यातील अनेक युवकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्य सत्कार नंतर अनेकांनी सुनीलबापू सावंत यांचा व्यक्तीशः सत्कार केले.
आमचे चुलते कै.सुभाषआण्णा सावंत यांनी सत्ता मिळो अथवा न मिळो, परंतु तत्व व चाकोरी सोडून वागायचे नाही. कितीही गरीब असलातरी त्यावर अन्याय झाल्यास त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व शक्तीने लढायचे; हे शिकवले आहे. तोच मार्ग आम्ही चालत आहोत. एखादी गोष्ट सत्य असेल आणि त्याला कितीही बलाढ्य माणसांनी विरोध केलातरी सुध्दा आपण त्या सत्य गोष्टीचा पाठपुरावा करतो व सत्यासाठीच संघर्ष करतो. हा संघर्ष यापुढेही चालवणार आहे. आजपर्यंत जे आपण सर्वांनी प्रेम केले तेच प्रेम यापुढेही द्या.. असेही भावनिक आवाहन सुनीलबापू सावंत यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पैलवान गणेश सावंत, नागेश उबाळे, वाजीद शेख, मजहर नालबंद, आनंद रोडे, पप्पू कसाब, पांडूरंग सावंत, शुभम बनकर, बापू उबाळे, नागेश कसाब, राजेंद्र वीर, मार्तंड सुरवसे, धोंडिराम अडसुळ, औदुंबर बनकर, मंगेश शिरसाट, सुनील अंधारे, विकास पवार, अनिल यादव, साजिद बेग, फिरोज बेग, अरबाज बेग, खलील मुलाणी, सागर सामसे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशांत खारगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. जान्हवी सावंत यांनी मानले.