प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना ‘सुर सुधा जीवन गौरव पुरस्कार’
करमाळा : यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सुर सुधा जीवन गौरव पुरस्कार सूर ताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना देण्यात आला. नरारे यांनी करमाळा तालुक्यात 26 वर्ष संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार आमदार संजय मामा शिंदे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर दत्तात्रेय देवळे, डॉ.ॲड.बाबुराव हिरडे उपस्थित होते. श्री नरारे यांनी 26 वर्ष सूर ताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संगीत विशारद अलंकार झाले असून करमाळा तालुक्यात संगीता क्षेत्राचे वलय निर्माण केले आहे, याची दखल घेत श्रीफळ, ट्रॉफी आणि ५१ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
यावेळी समाजसेवक श्रेणिक खाटेर, डॉ कविता कांबळे, करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, नगरसेवक महादेव फंड, डॉ प्रमोद कांबळे, डॉ शेटे, डॉ भोसले, डॉ दीपक पाटील, डॉ महेश वीर, डॉ विजयकुमार जाधव, चोपडे गुरुजी तसेच आर्ट ऑफ लिविंग करमाळा व पतंजली योग समिती करमाळा चे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने रसिक वर्ग उपस्थित होता.