भोसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली सुरवसे यांची निवड

करमाळा(दि.२६): भोसे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रुपाली भारत सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कविता हनुमंत वारे यांच्या उपसरपंच पदाच्या राजीनाम्यानंन्तर रिक्त झालेल्या पदावर सौ. सुरवसे यांची निवड करण्यात आली.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच डॉ. दीपक सुरवसे, मेजर गुलाब खेडकर,प्रा. विजय रोडगे, माजी मुख्याध्यापक निवृत्ती सुरवसे यांची भाषणे झाली.
यावेळी माजी उपसरपंच जयंत वारे, कुंडलिक सुरवसे, हनुमंत वारे,माजी सरपंच भोजराज सुरवसे, दिगंबर बागल पतसंस्थेचे अध्यक्ष बबन भाऊ सुरवसे, सचिव शंकर घनवट, विमा प्रतिनिधी विलासराव रोडगे, उद्योजक प्रीतम सुरवसे, बबन थोरात, बापू बागडे, ज्ञानदेव सुरवसे, महादेव सुरवसे, नंदू सुरवसे, मोहन वारे, बापू पवार, पप्पु सुरवसे, भारत किसन सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.





