शेटफळ येथील सुशेन पोळ यांचे निधन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.22 : शेटफळ ( ना.) येथील सुशेन ईश्वर पोळ (वय ६२) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने शेटफळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्व.सुशेन पोळ हे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ यांचे वडील होत. आपल्या साध्या, शांत व मितभाषी स्वभावामुळे ते ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय होते. समाजकारण व सामाजिक जाणीव असलेल्या कुटुंबातून ते आले होते. गावातील विविध उपक्रमांत त्यांनी नेहमी सहभाग घेतला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (ता.21)सकाळीच शेटफळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

 
                       
                      