बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी जामीन मंजूर.. - Saptahik Sandesh

बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी जामीन मंजूर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : देवळाली (ता.करमाळा) येथील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय बार्शी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

या प्रकरणामध्ये 16 मे 2023 मध्ये देवळाली येथील संशयित आरोपीस करमाळा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. IPC 363,376 कलम प्रमाणे गुन्हा दाखल होता, सदर प्रकरणी आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला, यामध्ये न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस 50,000/- हजार रुपयांवर जामीन मंजूर केला. या प्रकरणी संशयीत आरोपीतर्फे ॲड.नितीन पाटील व ॲड.अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!