शेटफळ येथील आयुष दगडे व विश्वजित लबडे यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेटफळ (ना) (ता.करमाळा) येथील प्राथमिक शाळेत पाचवीमध्ये शिकणाऱ्या आयुष महेश दगडे याची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापुर येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड झाली आहे.
याशिवाय ऑल इंडिया सैनिक स्कुल प्रवेश परिक्षेत सुद्धा या शाळेचे विश्वजीत विवेक लबडे व आयुष महेश दगडे हे दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यांना वर्गशिक्षिका श्रीमती कालींदा गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत असून येथील शाळा व्यवस्थापन समिती व शेटफळ ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस व शिक्षक उपस्थित होते.


