तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सुयश
करमाळा (दि.११) -करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडला विविध खेळामध्ये चिखलठाण येथील न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या प्रशालेचे खेळाडूंनी विविध स्पर्धेत यश संपादन केले.
न्यू इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे यश मिळविले –
- तिहेरी उडी (मुली) स्पर्धेत कु अंकिता संतोष शिंदे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक (जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड)
- तिहेरी उडी (मुले) स्पर्धेत श्रेयस धनेश्वर सरडे याने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. (जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड)
- गोळा फेक (मुली) स्पर्धेत कु.सिद्धी नागनाथ लबडे हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. (जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड)
- हातोडा फेक (मुले) स्पर्धेत -संकेत शिवाजी लोखंडे याने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला.
- 4×400 मीटर रिले (मूले)- तृतीय क्रमांक
यावेळी तिहेरी उडी व गोळा फेक या स्पर्धेतील खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना क्रीडा शिक्षक श्री. योगेश शेवाळे यांचे मार्गदर्शन मिळाले. या सर्व विजेत्यांना तालुका क्रिडा समन्वयक प्रा. राम काळे सर यांच्या हस्ते मेडल दिले गेले. न्यू इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ ब्रिजेश बारकुंड, चिखलठाण चे सरपंच विकासबापू गलांडे, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, मुख्याध्यापक आनंद कसबे, यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.