मैत्राच्या जगातील सिंकदर….

सिकंदर ने तलवारीच्या जोरावर जग जिंकलं. खरंतर अंगी धाडस,हाती तलवार आणि लढाऊ सैन्य असलेतर जग सहज जिंकता येतं पण एक माणूस जिकणं तेवढ सोप नसतं.. पण प्रेमळ स्वभाव, निस्वार्थी मैत्री , संकटात आणि सुखातही धावून जाण्याची वृत्ती असेलतरच माणसं जोडली जातात व जिंकताही येतात.
सिंकदरने जगावर राज्य केलं पण निळकंठ ताकमोगे हा माणूस माणसांच्या मनावर राज्य करतोय म्हणूनच ते मैत्रीच्या जगातील सिकंदर आहेत.
हसतमुख चेहरा, बोलण्यात मधुरता, आणि कोणताही परिचय नसतानाही समोरच्याला सहज आपलंसं करून घेण्याची कला असं मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणजे निळकंठ ताकमोगे.
त्यांचं बालपण करमाळा तालुक्यातील साडे या गावात गेलं. त्यांचे वडील, देविदास ताकमोगे सर, साडे हायस्कूलमध्ये कार्यरत होते. त्यामुळे शिक्षण व संस्कारांचं उत्तम वातावरण त्यांना साडे गावातच लाभलं. तसं त्यांचं मूळ गाव माढा तालुक्यातील कव्हे, पण आज साडे हीच त्यांची कर्मभूमी झालंय.
शैक्षणिक जीवनात पदवीधर झाल्यावर ‘नोकरी की व्यवसाय’ असा प्रश्न समोर उभा राहिलाच. पण त्यांच्या आयुष्याला वळण देणारा प्रसंग घडला.एलआयसीचे वरीष्ठ अधिकारी डुंबरे साहेबांची व त्यांची भेट झाली. त्यांनी निळकंठ यांना स्पष्ट सांगितले “एलआयसीमध्ये एजंट हो.” ते वाक्य त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून गेलं.
त्यानंतर जे घडलं ते खरंच प्रेरणादायी होतं – कारण LIC क्षेत्रातील व्यवहार, आर्थिक ज्ञान, क्लायंट डीलिंग या गोष्टी त्यांच्या पार्श्वभूमीपासून दूर होत्या. पण ज्या माणसात आत्मविश्वास, जिद्द आणि लोकांशी नातं जोडण्याची ताकद असते, त्याच्यासाठी काहीही अशक्य नसतं. अरुणिमा सिन्हाने अपंग असूनही एव्हरेस्ट सर केला, तसेच निळकंठ ताकमोगेंनी कोणतीही पार्श्वभूमीनसताना एल आयसी क्षेत्रात एकामागोमाग एक यश मिळवत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला.
साडे, कुर्डुवाडी, बार्शी, करमाळा आणि पुणे या ठिकाणी त्यांनी वेळेनुसार आपली स्वातंत्र कार्यलये उभारली. या प्रवासात त्यांचा शेकडो लोकांशी संबध आला. त्यातूनच त्यांनी मैत्रीचा, विश्वासाचा आणि व्यवसायीकतेचा धागा जोडला. हे नातं केवळ व्यवसायापुरतं मर्यादित न ठेवता ते एक कौटुंबिक बनवलं. आणि याच मैत्रीच्या, माणुसकीच्या धाग्यातून पुणे येथे त्यांनी स्वतःचं भव्य कॉर्पोरेट ऑफिस उभारलं. एका सामान्य गावातल्या ,सामन्य मुलाचं हे असामान्य स्वप्न साकार झालं.
पण इथेच त्यांची कहाणी संपत नाही…
त्यांचं आयुष्य हे फक्त स्वतःपुरतं यश मिळवण्याचं नव्हतं, तर इतरांना उभं करण्याचं, मदतीला धावून जाण्याचं, समाजासाठी काहीतरी करण्याचं होतं. त्यांनी शहीद नवनाथ गात स्मारक समितीच्या माध्यमातून रक्तदान, ग्रंथालय, सामाजिक पुरस्कार व धार्मिक उत्सव पार पाडले आहेत.व्यसनमुक्तीच्या मोहिमा, शिवजयंती उत्सव, शनीदिंडीतील सक्रिय सहभाग, आपत्ती काळातील निधी संकलन, अशा अनेक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला.
संकट कोणाचंही असो – मग गावकऱ्यांचं, मित्रांचं, किंवा अनोळखी माणसाचं – निळकंठ ताकमोगे हे पहिल्यांदा धावून जाणारे असतात. यातूनच राम भोसले (कंदर), सुहास एकड (खातगाव), नागा गात (वरकुटे), सचिन गाडेकर (साडे), रवींद्र पवार (उद्योजक, पुणे), असे विविध क्षेत्रांतील दिग्गज मित्र त्यांनी जोडले… आणि त्या नात्याला त्यांनी आजही जपलं आहे.एलआयसी बरोबरच शेती, आगरबत्ती व्यवसायही त्यांनी केले.
त्यांचा हा यशस्वी प्रवास त्यांच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने, सौ. सपना यांचं पाठबळाने, आणि अनेक मित्रांच्या विश्वासाने बहरला आहे. त्यांची दोन्ही मुलं ही वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून उच्च शिक्षण घेत आहेत.
निळकंठजी आज मोठे व्यावसायिक असले तरी त्यांचे पाय अजूनही मातीशी जोडलेले आहेत आणि मनात अजूनही माणुसकीची उब आहे.
निळकंठ ताकमोगे-पाटील
आपलं यश असंच प्रगल्भ होत जावो, आयुष्यात समाधान, समृद्धी आणि समाजासाठी अजूनही नवीन प्रेरणा मिळवणारा प्रवास सुरू राहो, हीच या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा…!
डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न 9423337480