गुणवंत विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य असून त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वतोपरी सहकार्य करणार – दिलीप धोत्रे
करमाळा संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गुणवंत विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य असून त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केले. करमाळा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाल श्रीफळ सलमानचिन्ह जेवण करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजय मामा शिंदे महाराष्ट्र नेते मनसे दिलीप बापू धोत्रे टायगर ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र तानाजी भाऊ जाधव सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे जगताप गटाचे नेते शंभूराजे जगताप सावन गटाचे नेते सुनील बापू सावंत सामाजिक कार्यकर्ते उद्योजक भरत भाऊ अवताडे श्रेणिकशेठ खाटेर नगरसेवक प्रवीण आबा जाधव युवा नेते अमीर तांबोळी युवा नेते संतोष वारे मानसिंग खंडागळे आशपाक जमादार देवीचामाळचे मा. सरपंच अनिल पवार टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर उद्योजक भरतभाऊ अवताडे अर्बन बँकेचे माजी संचालक शिवराज भाऊ चिवटे युवा नेते अमोल परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी हे देशाचे पुढील भविष्या असून भारताला महासत्ता बनवण्याचे काम ही पिढी करणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना अनुसरून समाजातील चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देऊन .समाजामध्ये बदल घडवण्यासाठी महा मनसे कार्यरत असून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी उज्वल भविष्य साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणे ही काळाची गरज आहे, समाजातील विषमतेची दरी कमी करून भारताला महासत्ता बनवण्यासाठी आधुनिक विचारांची कास्ट करून संस्कारक्षम पिढी घडवणे यासाठी राजकीय पक्षांनीही कौतुकाची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर घेणे आवश्यक असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना माणुसकी हाच खरा धर्म याचे तंतोतंत पालन करत असल्याने जनता मनसेच्या पाठीशी खंबीर पण उभे राहील विश्वास त्यांनी व्यक्त केला करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की माझ्या यशामध्ये मनसेचा महत्त्वाचा वाटा असून मनसेच्या कार्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करू दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा स्तुत्य उपक्रम आहे. मनसेच्या समाज उपयोगी उपक्रमाचा इतर राजकीय पक्षांनी .नेत्यांनी आदर्श आदर्श घेणे ही काळाची गरज आहे या कार्यक्रमाची यशस्वीपणे आयोजन मनसे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.मनसे तालुकाप्रमुख संजय बापू घोलप व सर्व मनसे व सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे पालक पदाधिकारी आभार मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी मानले.