तालुकास्तरीय कराटे स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न

करमाळा (ता.१६ ऑगस्ट) – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा सेवक संचालनालयांतर्गत तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धांचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे विश्वस्त व महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांच्या हस्ते झाले. या वेळी करमाळा तालुका क्रीडा समन्वयक रामकुमार काळे, पुरुषोत्तम माने (भैरवनाथ विद्यालय, जातेगाव), नागनाथ बोळगे (वीर शिवाजी महाराज क्लब, करमाळा), सागर शिरस्कर (त्रिमूर्ती क्लब, करमाळा), अमोल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.


स्पर्धेत पंच म्हणून संतोष झिंजाडे, अभिषेक कुतवळ व सुरज वायकूळे यांनी काम पाहिले. तालुक्यातील क्रीडा प्रशिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



