जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिवस साजरा

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : झरे (ता.करमाळा) येथील श्री भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले तसेच संस्थेच्या खजिनदार आशा बिले व संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती बिले उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम सेमिनार हॉलमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये मुले खूप उत्साही दिसून आली. मुलांनी प्रत्येक शिक्षकांसाठी ग्रीटिंग कार्ड बनवले होते. मुलांनी सर्व शिक्षकांना ग्रीटिंग कार्ड देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुलांना गोड खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश बिले सर यांनी मुलांना शिक्षकांचे महत्त्व पटवून देत मुलांना स्फूर्ती दिली. तसेच आदर्श शिक्षक कसा असावा याबद्दलही त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. व कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांना याप्रसंगी भेट वस्तू देण्यात आल्या. सर्व शिक्षकांनी संस्थेचे आभार मानले व हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन श्री कोंडलकर सर यांनी केले व हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब खराडे व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. हा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला.

