मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तहसीलदारांकडे केली मागणी
केम (संजय जाधव) – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकित करमाळा तालुक्यातील उमरड येथील मतदार यादी मध्ये शंभर पेक्षा जास्त मतदारांच्या नावापुढे डिलीट असा शिक्का मारल्याने या मतदारांना मतदान करता आले नाही. एकीकडे शासन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात दुसरीकडे अशा अक्षम्य चुकामुळे मतदानाचा टक्का घसरत आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या चुकामुळे हे घडले आहे त्यांचा शोध घेऊन अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी बहुजन सेनेचे जिल्याध्यक्ष राजाभाऊ कदम, माजी सरपंच संदिप मारकड, पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे यांनी करमाळा तालुक्याच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्या कडे समक्ष लेखी निवेदन देऊन केली आहे. या वेळी तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.