तेज ग्यान फाउंडेशन च्या ज्ञान ध्यान केंद्राचा शुभारंभ संपन्न
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.९:तेज ग्यान फाउंडेशन च्या ज्ञान ध्यान केंद्राचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे ,.ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड.बाबुराव हिरडे ,यश कल्याणी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, प्रा.गणेश करे-पाटील, डॉ. वसंतराव पुंडे ,माजी नगरसेविका सौ.संगीता खाटेर यांच्या हस्ते ज्ञान ध्यान केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वालचंद माने यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दिगंबर गडमजी, वेद परमार ,डॉ. श्री.सुबोध धनवटे हे पंढरपूरहून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झिंजाडे यांनी केले. कार्यक्रमांमध्ये ध्यानाचे महत्त्व व तेजग्यान फाउंडेशन चा परिचय दिगंबर गडमजी यांनी करून दिला . यावेळी ध्यानाचे महत्त्व सांगणारा *सरश्रींचा* 25 मिनिटांचा व्हिडिओ दाखवण्यात आला. तसेच ध्यानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
दर रविवारी विनामूल्य समाजातील सर्वांसाठी हे ध्यान केंद्र प्रशिक्षण पुंडे हॉस्पिटल या ठिकाणी देणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.
यावेळी ॲड. हिरडे, श्रेणिकशेठ खाटेर, करे-पाटील व श्री. घुगे यांनी मार्गदर्शन केले.तर आभार सौ सुवर्णा पाटणे यांनी मानले.
या कार्यक्रमात सेवा देण्यासाठी एकूण 18 तेजसेवक तेजसेविका उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी करमाळा शहरातील अनेकजण उपस्थित होते.