महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केम येथे तणाव – आरोपीला अटक
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील केम येथील एका तरूणाने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. यानंतर चिडलेल्या केमच्या ग्रामस्थांनी गाव बंद करून शिवशंभो वेशीवरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.
अशा तंग वातावरणात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी शांततेचे आवाहन केले आहे. परंतु ग्रामस्थांनी जो पर्यंत आरोपीला केम येथे आणत नाही तो पर्यंत पुतळ्यासमोर उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे. यावेळी फार मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. करमाळा पोलिसांनी सदर आरोपींना अटक करून करमाळा न्यायालयात हजर केले होते.