केम येथील भुयारी मार्गाचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन - विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरती टीकास्त्र -

केम येथील भुयारी मार्गाचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन – विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरती टीकास्त्र

0

केम (संजय जाधव) : शुक्रवारी दिनांक 11 जुलै रोजी केम येथील भुयारी मार्गाचा उदघाटन करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

केम गावाच्या रेल्वे लाईन पलिकडे छोटी मोठी सुमारे 7 ते 8 गावे असून केम – ढवळस व इतर गावांना जोडण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे गावातील लोकांना व आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक ग्रामस्थांनी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे केम ढवळस रेल्वे क्रॉसिंग रस्त्यावर भुयारी मार्ग करावा अशी मागणी केली होती. याची दखल घेत आमदार शिंदे यांनी रेल्वे प्रशासनकडे या संदर्भात प्रस्ताव दाखल करून भुयारी रस्त्याची मागणी केली होती.

रेल्वे विभागाने सहकार्याची भूमिका दाखवत त्यांच्या बजेट मधूनच संबंधित भुयारी मार्गासाठी निधी मंजूर केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. शुक्रवारी दिनांक 11 जुलै रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते या कामाचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला.

भुयारी मार्गाचे काम व्हावे यासाठी रेल्वे विभागाकडून मंजुरी नसती मिळाली तर राज्य सरकारच्या बजेट मधून या मार्गासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मी तयारी दर्शवली होती परंतु रेल्वे प्रशासन विभागाने सकारात्मक भूमिका घेऊन मार्ग मंजूर केला याबद्दल मी रेल्वे प्रशासनचे आभार मानतो. – माजी आमदार संजयमामा शिंदे

विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरती टीकास्त्र!

यावेळी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, 2019 ते 2024 या कालावधीत आपण मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर करून घेतली. याच कामांचे नारळ फोडण्याचे काम विद्यमान आमदार करत असून एकही नवीन काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अद्यापही मंजूर केलेली नाही. उलट मंजूर असलेली विकास कामे बंद करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. एकीकडे दहीगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिकेतून करावे अशी मागणी विधानपरिषद सभागृहांमध्ये आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते असलेले आमदार नारायण पाटील मात्र या कामाला विरोध करत आहेत हा विरोधाभास का आहे ?  याचा जाब केम व वडशिवणे ग्रामस्थांनी विचारला पाहिजे.

चुकीच्या धोरणामुळे कायमस्वरूपी योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांना फटका!

वडशिवणे तलावात पाणी दिले म्हणून डंका पेटवला जातो परंतु त्या तलावाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपण तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2024 मध्येच पत्र दिले होते. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिका वितरण प्रणालीतून झाल्यानंतर बचत होणाऱ्या 0.46 टीएमसी पाण्यामधून अतिरिक्त गावांना पाणी देता येईल त्यामध्ये वडशिवणे तलावही आहे.एखाद्या भागाचा कायापालट करायचा असेल तर त्यासाठी कायमस्वरूपी तरतूद करावी लागते. विद्यमान आमदार मात्र वरवरची मलमपट्टी करण्यामध्येच व्यस्त आहेत. मागेल त्याला पाणी देण्याचे धोरण त्यांनी  उन्हाळी आवर्तनात राबविले त्याचा फटका कायमस्वरूपी योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या वरकटणे, सरपडोह ,सौंदे,साडे या गावांना बसला हे धोरण चुकीचे आहे असाही घनाघात त्यांनी केला.

महत्त्वाचे आश्वासन

या वेळी संजय मामा शिंदे यांनी हॅम अंतर्गत मंजूर झालेल्या राजुरी ते वेणेगाव रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगून, कोणी किती अफवा उठू द्या केम मार्गे हा रस्ता होणार आहे असे त्यांनी सांगितले. तसेच केम परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी डिपीसीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये उद्धव माळी, सागर दौंड, आनंद शिंदे, संदीप तळेकर, अच्युत पाटील, विजयसिंह ओहोळ, सागर कुडै, दत्तात्रय बिचितकर, कांतीलाल पवार, दत्ता तळेकर, विष्णू अवघडे, सचिन श्रृंगारे, गोरख पारखे, सचिन तळेकर, सुलतान मुलाणी, उत्तरेश्वर सुरवसे, अरुण लोंढे, मारूती पारखे, संजय तळेकर, नवनाथ सुरवसे, परमेश्वर तळेकर, महादेव पाटमास, हरिभाऊ तळेकर, बाळू सुरवसे, बाळू म्हेत्रे, धनंजय ताकमोगे, विकास कळसाईत, योगेश ओहोळ, राजेंद्र देवकर, सूरज ढेरे, निंभोरे सरपंच रवींद्र वळेकर

शिवसेना जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर, भगवान माळी, गौरव सुरवसे, चंदू बिचितकर, प्रहार संघटना तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, विष्णू दादा पारखे, उपसरपंच सागर कुरडे, गणेश तळेकर, अण्णासाहेब पवार, चंद्रकांत तळेकर सर, सचिन रणशिंगारे, संजय नवले, बालाजी अवताडे, रिझवान झारेकरी, विष्णू ओहोळ, नागेश सुरवसे, बाजीराव तळेकर, राजू तळेकर, दीपक तळेकर, बळीराम तळेकर, संतोष कुर्डे, सुरेश देवकर, संजय आप्पा तळेकर, बापू तळेकर, अशोक तळेकर, पिनू तळेकर, अण्णासाहेब तळेकर, तानाजी तळेकर, ईश्वर मस्के, दत्ता वळेकर आणि नाथ शिंदे यांचा समावेश होता. यांच्यासह बिचितकर वस्ती, बाराभाई मळा, जनई वस्ती तसेच केम, ढवळस व पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी बांधव व युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!