भुसार व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी -विक्रांत मंडलेचा -

भुसार व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी -विक्रांत मंडलेचा

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.९: करमाळा भुसार व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विक्रांत मंडलेचा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यानिवडीनंतर नुतन अध्यक्ष व सहकार्यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

भुसार असोसिएशन ची बैठक  माजी अध्यक्ष विजयकुमार दोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुढील कालावधीसाठी पदाधिकारी निवडले. त्यानुसार  उपाध्यक्षपदी मयूर दोशी, सचिवपदी प्रीतम लुंकड व सहसचिवपदी उत्कर्ष गांधी यांची निवड करण्यात आली आहे.

या वेळी मावळते माजी उपाध्यक्ष अनिलकुमार सोळंकी, माजी सचिव मिलिंद दोशी यांच्यासह सर्व व्यापारी उपस्थित होते. निवडीनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार
बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

“करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक टिकवून ठेवण्यात व्यापारी वर्गाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे,”

जयवंतराव जगताप,  सभापती, कृ.उ.बा.समिती, करमाळा.

या कार्यक्रमाला अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, माजी नगराध्यक्ष अमोद संचेती, बाजार समितीचे संचालक परेशकुमार दोशी, मनोज पितळे, बाळासाहेब पवार, माजी संचालक संतोष वारे, सुनील मेहता, कृषी अधिकारी देवराव चव्हाण, तसेच व्यापारी राजेंद्र चिवटे, गोरख ढेरे, कालिदास लोंढे, विलास जाधव, विपुल शहा, पप्पू कटारिया, शिरीष व्होरा, गिरीश दोशी, आशिष बोरा, जयराज चिवटे, प्रवीण कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!